लेबल

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस आठवा : भजनी भारुड

 

भारूडाचे साधारणपणे तीन प्रकार पडतात

१) सोंगी भारुड

२) गुड भारुड

३) भजनी भारुड

भजनी भारुड हे कीर्तना सारखे असते. भजनी भारुड हे प्रामुख्याने भजन आणि भारूड यांचे एकत्रीकरण केल्याचे दिसून येते. टाळ मृदुंग किंवा पखवाज या वाद्यांच्या साथीत ईश्वर गुजरवर्णपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास भजन असे म्हणतात.भजनात पारंपारिक चालीं बरोबर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेली भजनी पठाडे गेल्या काही वर्षात तयार होत आहेत. यांनी भजन ऐकणारा भाविक आणि शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या श्रोतावर्ग तयार केला.
तर मग चला आज पाहूया दोंदे या गावातील बब्बु बारभाई आणि मंडळी यांनी सादर केलेलं  भजनी भारूड.

बब्बु बारभाई आणि मंडळी, दोंदे

बब्बु बारभाई (8308328651)
#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...