लेबल

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस सातवा : गवळण

 

गवळण म्हणजे आपल्या मराठी लोकसाहित्यातील एक गीत प्रकार. गवळण म्हणजे कृष्णाच्या बालक्रीडा, त्यांच्या खोड्याने त्रस्त झालेल्या गवळण यांनी यशोदे कडे आणलेल्या तक्रारी,त्यातूनच गवळणींनी मांडलेले कृष्णाची प्रसन्न कौतिक, गवळणी ना वेडावुन टाकणारी कृष्णाची मुरली , कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकूळ झालेल्या गवळणींचा विरह भाव , यांचा भागवत कट अविष्कार गवळणीत आढळतो. या विशिष्ट गीत प्रकारास यामुळेच गवळण असे नाव पडले आहे.
तर मग चला आज पाहूया औसारी या गावातील बबन वामन राजगुरू आणि मंडळी यांनी सादर केलेली गवळण.

बबन वामन राजगुरू आणि मंडळी, औसारी बुद्रुक

  • बबन वामन राजगुयू ( 7350627034)
  • ढोलकी - पामाजी तुकाराम पंचरास, संदीप शिवाजी पंचरास
  • हालगी - दादाभाऊ विष्णू पंचरास
  • कोरस - बबन पंचरास, प्रभाकर पंचरास #Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...