लेबल

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस नववा : तमाशाची गाणी

 

तमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. भारतात विविध भागात विविध स्वरूपाचे लोकनाट्य प्रकार आढळून येतात. उदाहरण उत्तर व मध्य भारतात रामलीला रासलीला. गुजरातेत भवाई. दक्षिण भारतात यक्षगान तसेच महाराष्ट्रात तमाशा आहे. तमाशा मुख्यतः होळीच्या सणात उत्सवात जत्रा उरुसाच्या प्रसंगी होतात. पण तमाशा म्हटलं की आजही काही लोकांना आचरट कलाप्रकार अशी समजूत रूढ असल्याचे दिसते. तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हा अत्यंत आवडता खेळ आहे. आणि जुन्या या काळातील कित्येक भटकी जमातीला स्थिरता आणि आधार देण्याचे मोलाचे काम केले.तर मग चला आज पाहूया  चैतन्यपूर या गावातील नंदारानी भोकटे आणि मंडळी यांनी सादर केलेली तमाशाची गाणी .

नंदारानी भोकटे आणि मंडळी, चैतन्यपूर

  • नंदारानी भोकटे (9767099360)
  • ढोलकी - दत्तात्रय भोकटे #Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...