लेबल

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस पाचवा : जागरण

 

कुलस्वामी श्री खंडेरायाच्या कुलाचारामध्ये जागरण हा प्रमुख भाग आहे. जस देवीच्या कुलाचारामधील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्व जागरणाला आहे.

आजच्या धावपळीच्या जगामध्ये जागरण हा शब्द रात्रभर जागणे यापुरता मर्यादित स्वरूपात पाहिला जातो परंतु जागरण या शब्दाचा अर्थ जागृत करणे होय. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपली कुलस्वामिनी जागृत करणे म्हणजेच जागरण.



तर चला आज प्रत्यक्षात बघूया विलास अटक  आणि मंडळी यांनी सादर केलेलं जागरण 

विलास अटक आणि मंडळी, बेल्हे

  • विलास अटक (9860609327)
  • गायक आणि खंजीर - नामदेव शिंदे
  • टाळ - श्यामराव
  • तुणतुणे - विलास शिंदे
  • मुरळी - मीरा दळवी
  • वाघ्या - सागर रोकडे




#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.





- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...