लेबल

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस चौथा : जात्यावरची गाणी


जात्यावरची गाणी हा मराठी काव्यामधील एक छंद आहे. आपण सर्वांनीच लहानपणी पुस्तकात किंवा ग्रामीण भागात स्त्रीया दळण करताना जात्यावरची गाणी म्हणताना पाहिलं किंवा ऐकलं असेल.




जरी हा एक छंद असला तरी यांचे विषय संसार, धर्म, संस्कृती, समाज, व्यवहार ज्ञान, शिक्षण, विवाह, मुंज, भावा बहिणीचे नाते, माहेर, जत्रा, स्त्री जन्म अशा महत्वाच्या विषयांवर असतं. तरी यांनी आपल्या समाजामध्ये खूप मोठे मोलाचे काम केले आहे.

तर मग चला आज पाहूया चमूबाई वैरागे आणि त्यांच्या संघांनी सादर केलेली जात्यावरची गाणी.

चमूबाई वैरागे आणि मंडळी

चमूबाई वैरागे  (9975474712)




#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.



- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...