लेबल

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस दहावा : भारूड

 

भारुड या शब्दाचा अर्थ ‘लांबच लांब,गुंतागुंतीची वृत्तांत कथा अवघड कुटकविता,लेख,रूपक इ. असा महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे. मात्र भारुड हा महारष्ट्रात रचनाप्रकार म्हणून ओळखला जातो. अध्यात्मतत्व प्रतिपादन करताना ते सरळ विधानात्मक स्वरुपात न सांगता रूपकाच्या माध्यमातून सांगणे.संतानी आपली शिकवण रूपकांच्या साहायाने अत्यंत आकर्षक स्वरुपात संगीतली आहे. महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व संतानी भारुडाची रचना केली असली तरी भारुड म्हटलं कि एकनाथ महाराजांचे नाव समोर येते. संत एकनाथांनी अनेक विषयावर विपुल भारुडे लिहली आहेत. त्यांची भारुडे अत्यंत आकर्षक आणि विविधतापूर्ण त्याचप्रमाणे नाट्यानुकुल आहेत.तर मग चला आज पाहूया पुणे येथील विजय तावरे आणि मंडळी यांनी सादर केलेलं भारूड.

विजय तावरे आणि मंडळी, पुणे

  • विजय तावरे (9604118340)
  • ढोलकी - लक्ष्मी लांबे
  • सिन्थ - निलेश लांबे
  • खंजीर  - चंद्रकांत लसूणकुटे
  • संबळ - प्रथमेश लसूणकुटे#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...