लेबल

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस सतरावा : बतावणी


रोजच्या आयुष्यातली एखादी घटना, प्रसंग विनोदी पद्धतीने रंगवून सांगणे त्यात आजचा आशय टाकून राजकीय टोमणे मारणे,प्रेक्षकांना हसवत खिदळत तमाशाला पुढे सरकवणे म्हणजे बतावणी.तर मग चला आज पाहूया लोणी या गावातील ज्ञानेश्वर विष्णू पंचरास आणि मंडळी यांनी सादर केलेली बतावणी .

ज्ञानेश्वर विष्णू पंचरास आणि मंडळी, लोणी

  • ज्ञानेश्वर विष्णू पंचरास ( 9307415427)
  • सुभाष जयवंत पंचरास
  • ज्ञानेश्वर दादाभाऊ जाधव  #Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...