लेबल

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस अठरावा : पोतराज

 

महाराष्ट्रातील मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक म्हणजे पोतराज. पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तू राजू या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु किंवा पोतू म्हणजे रेडा किंवा बोकड . बोकडाची बली क्रिया पार पाडणारा पोतू राजू अशी ही त्याची ओळख.
तर मग चला आज पाहूया धायरी या गावातील सुखदेव साठे आणि मंडळी यांनी सादर केलेला  पोतराज हा लोककला प्रकार.

सुखदेव साठे आणि मंडळी, धायरी

  • सुखदेव साठे (9763797199)
  • सुवर्णा शिंदे
  • आप्पा हरिभाऊ शिंदे
  • साहेबराव सुखदेव साठे #Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...