खूप कमी जणांना माहिती असेल की पोवाड्यात तीन प्रकारचे कवणे आढळतात
1) देवतांच्या अद्भुत लीला आणि तीर्थक्षेत्राचे महात्म्य
2)राजे सरदार व धनिक यांचे पराक्रम, गौरव
3)लढाई दंगा दरोडा
दुष्काळ पूर इत्यादी उग्र वा कुतूहलजनक घटनांचे निवेदन
तर मग चला आज पाहूया बेल्हे या गावातील विलास अटक आणि मंडळी यांनी सादर केलेला शाहिर आणि पोवाडा हा लोककला प्रकार.
विलास अटक आणि मंडळी,
बेल्हे
- विलास अटक (9860609327)
- प्रमोद अटक
- गणेश तापसे
- नामदेव शिंदे
- श्यामराव शिंदे
#Lokkala2020
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे
मानद संचालक
भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र
(ललित कला केंद्र, गुरुकुल)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा