लेबल

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस तिसरा : शहनाई

 

शास्त्रीय संगीतापासून लग्नकार्या मध्ये पण दिसणारे वाद्य म्हणजे शेहनाई. शेहनाई इतर वाद्या बरोबर असो किंवा एकटी मात्र तरी शेहनाईचे कायम स्वतःचं वेगळेपण जाणवतं. ज्याप्रमाणे इतर वाद्यांमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे, त्याचप्रमाणे शेहनाई मध्ये एक गोड आणि मन समाधान करण्याची किमया आहे.




याचा आवाज शुभदा आणि पवित्रता साठी होतो अशी मान्यता आहे त्यामुळे याचा वापर लग्नकार्य, मंदिर, रथयात्रा, संगीत अशा प्रमुख ठिकाणी केलेला दिसून येतो.

तर मग चला औसरी या गावातील संजय गायकवाड आणि मंडळी यांची आपण शहनाई वादन पाहूयात.


संजय गायकवाड आणि मंडळी, औसरी बुद्रुक

  • सनई वादक - संजय दत्ता गायकवाड (97305 35033)
  • हलगी वादक - बाजीराव भगवान गायकवाड
  • धूम  वादक - भगवान नारायण गायकवाड
  • ताशा वादक - अविनाश गुलाब गायकवाड




#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.



- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...