लेबल

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस दुसरा : वासुदेव

 

वासुदेव हरी वासुदेव हरी

सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी

बरोबर ओळखलं आज मी बोलतोय वासुदेवा बद्दल..... डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायात विजार किंवा धोतर कमरेभोवती शेलवजा उपकरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेष आपल्याला दुरून पण लगेच लक्षात येतो..



सकाळच्या वेळेत घरोघरी हिंडून रामकृष्णांचा नाम घोष करत पांडुरंगावरील अभंग गवळणी म्हणत आणि नाचताना ते आपल्याला दिसतात.

तर मग चला आज बघुया भूगाव या गावातील शाहीर साळुंखे यांनी सादर केलेला वासुदेव हा लोककला प्रकार.

  • शाहीर साळुंखे ( 77449 72612 )
  • गोकुळ साळुंखे 



#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.



- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...