लेबल

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

लोककला२०२० दिवस पहिला : पोवाडा

 

पोवाडा म्हणजे  त्यांचा वरच्या पट्टीतला आवाज, दिमाखदार रुबाब सोबतीला वाद्यांची जोड आणि अंगावर काटा येणारा. उत्साहवर्धक अशी त्यांची बोली.

पोवाडा हा तसा मराठी काव्य प्रकार पण तरी यामध्ये लहान लहान गद्य सदृश्य वाक्य असतात. याची वैशिष्ट्ये म्हणजे बोलीभाषेतील जिवंतपणा ओघ व लय यामुळे ही रचना थेट आपल्या काळजाला हात घालतो.




जुन्या काळात महत्वाच्या घटना, राजे महाराजांचे पराक्रम, वैभव सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आणि आजही ग्रामीण भागात यांचे खूप महत्त्व आहे.

तर मग चला आज प्रत्यक्षात बघुया चाकण गावच्या  राजाराम कदम आणि त्यांच्या मंडळींनी सादर केलेला पोवाडा.

  • तुणतुणं  - राजाराम कदम ( 98225 27574)
  • डफ  - विलास फकीर भोसले 
  • टाळ  - सुनील कदम



#Lokkala2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.



- डॉ. प्रवीण भोळे

मानद संचालक

भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र

(ललित कला केंद्र, गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोककला२०२० दिवस विसावा : लावणी

  लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...