हालगी हे आपल्या लोक कलेतील एक पारंपरिक वाद्य आहे. जुन्या काळामध्ये राजाचे, अधिकाऱ्याचे आदेश, नियम, माहिती गावोगावी दूर पर्यंत पोचवण्यासाठी, सर्व जनतेला एकत्र करण्यासाठी, त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हलगी चा वापर होत असत.
अलीकडच्या काळामध्ये या
आधुनिक वाद्य आणि संगीतामुळे हालगी महत्व आणि मागणी खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले
असले तरी ग्रामीण भागात एखाद्या उत्सव, जत्रा प्रसंगी याची मागणी आणि प्रतिष्ठा आज पण दिसून येते.
तर मग चला आज पाहूया दोंदे या गावातील अंकुश पाटोळे आणि नानाभाऊ पाटोळे यांनी सादर केलेली हलगी वादन.
अंकुश पाटोळे आणि मंडळी,
दोंदे
- अंकुश पाटोळे (9921456529)
- नानाभाऊ पाटोळे (9273025969)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.
- डॉ. प्रवीण भोळे
मानद संचालक
भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र
(ललित कला केंद्र, गुरुकुल)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा